आज्या डॉक्टर तुम्ही का मी…


 बाबांना आम्ही तीन भावंडे मोठे बंधु बालासाहेब,बहिण रुक्मिणीबाई आणि तिसरा मी …बाबांच्या नशीबी कधी शाळा आलीच नाही. बाबांच अगदी लहानपणीच  वडिलांच छत्र हरवलेलं.सर्व भावंडात मोठे असल्याने सर्व भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी बाबांवर येऊन पडली.आणि ती अत्यंत बिकट परिस्थिती तुन पण निट नेटके पणाने सांभाळली पण .बाबाना सतत वाटायचं आपण नाही शिकु शकलो.त्यांना शिक्षणाची उणीव सतत भेडसावत होती.अक्षर ज्ञान नसल तरी ही ज्ञानाचे मोल त्याना माहित होत.मोठ्या बंधुला बारावी पर्यंतचे शिक्षण दिलं..त्याच समयी बहिणीच शिक्षण चालु होतं. मोठे भाऊ शिकुण सवरुन दुर्दैवाने ते कुठे नौकरीला लागु नाही शकले याची खंत वाटत होती.बाबा अतिशय सकारात्मक जीवन जगण्यावर विश्वास ठेवायचे . निराश न होता त्यांनी मला नुसतं शिकवलं नाही तर (यात मोठा वाटा मोठ्या बंधुचा पण होता.) तर उच्च विद्या विभुषित केलं.

मी निलंगा येथे प्राध्यापक म्हणून नौकरीला लागल्यानंतर माय माझ्या सोबत राहत असत बाबा कधी मधी यायचे करमल तोवर निलंग्यात राहुन पुन्हा गावाकडे जायायचे.सन 2015 ला माझ्याकडे आलेले होते. त्यांची खास बाब म्हणजे रात्रीच जेवण परिवारासमेत सर्वजण एकत्र बसुन करावे या विचारांचे  ते आग्रही होते.असच रात्री सर्वांसोबत जेवण झालं.ज्यांच्या त्यांच्या सोयीनुसार झोपलो असता.रात्री तीन ते चार च्या सुमारास बाबा सहजच उठले आणं उठता उठता तोल गेला जाग्यावर ते कोसळले.मुक्का मार लागला होता.माय तळमळ करित होती गोविंदराव ला उठवतो ना, पण काही केल्या बाबांनी मला उठवु दिलं नाही.कशाला उठवती लेकराला… झोपुन देना लेकराला.माय कासावीस होऊन कधी आयोडेक्स मार लागलेल्या ठिकाणी लावत होती. सकाळ होईपर्यंत बाबांनी वेदना सहन केल्या. ऊठुन पाहतो तर काय बाबा वेदनेने व्याकुळ होऊन पडलेले होते.जीव वर खाली झाला.घाई गडबडिने कापड अंगात घालुन निलंग्यातील नामवंत अस्थी रोग तंज्ञ डॉक्टर साहेबांकड घेऊन आलो.डाक्टर साहेबांची वाट पाहत बसलो शेवटी डॉक्टर आले .तपासणी साठी आत नेल्यानंतर डॉक्टरांनी एक्सरे काढावं लागेल असं सुचवलं. एक्सरे काढुन झालं.थोड्या विश्रांतीनंतर रिपोर्ट आला.पुन्हा साहेबांनी आत बोलावलं.साहेब एक्सरे प्रकाशाच्या दिशेने करित न्हाळत होते कि आजोबांचं एखादं हाड तर फ्याक्चर नाही झालं नसेल ना.काहीच दिसत नव्हतं शेवटी डॉक्टर साहेबांनी गोळ्या औषधी लिहुन दिल्या व या गोळ्या नंतर ठिक पाचव्या दिवशी पुन्हा तपासणीला या सांगितलं. डाक्टर साहेब मला एकांतात घेऊन सांगत होते आजोबांचं हाड मोडलेल आहे असं मलातरी वाटत.बाबांनचे डोळे व कान अगदी व्यवस्थितपणे कार्यरत होती. बाबांनी एकांतातली बाब ओळखुन म्हणाले साहेब हाड बिड काहीच मोडल नाही बघा…आज्या ला डॉक्टर अत्यंत प्रेमाने सांगायला लागले …आहो आजोबा ही तुम्हाला जी वेदना होत आहे ते हाड मोडल्या मुळेच होत आहे समजावत होते . हे फ्याक्चर केस फ्याक्चर स्वरुपात आहे आणि ते आता जरी दिसत नसलं तरी पाच  दिवसांनी दिसायवा लागेल. डॉक्टरांच म्हणणं अगदी शांत पणे ऐकुन म्हणाले साहेब मी आडानी माणुस पण माझं मला का वाटतं की माझं हाड मोडलेल नाही.डाक्टर साहेबांनी सर्व ऐकल्यावर म्हंटले आज्या डॉक्टर मी का तुम्ही…खदखदुन हसायला लागले व म्हणाले काय साहेब तुम्ही पण आम्हा आडाण्याची चेष्टा करता व्हय.नाही आज्या ही चेष्टा नाही तुमच्या काळजी पोटी सांगतोय .मी काय बोलणार गप गुमान साहेबांचं  व न शिकलेल्या माझ्या बाबासाहेबांचं ऐकत होतो.मी पण  डॉक्टर  होतो पण काय फायदा…साहित्यातली डॉक्टर की इथे नाही कामाची.पण बाबा आपल्या मतावर ठाम होते.शेवटी मी म्हणाले बाबा बघु या ना साहेब म्हणतात तसं असलं तर येऊ दवाखान्यात आणं काहीच नाही झालं तर सोण्याहुन पिवळं की…गाडीला किक मारली…बाबांना घेऊन घरी आलो.माय वाटे वरती डोळे लावुन बसली होती कधी येत्यात म्हणुन.आम्हाला पाहताच जीवात जीव आला.शांत पणे वाट पाहत असलेली माय विचारत होती.काय म्हणंटले डॉक्टर नी…काय नाय माय एक्सरे काढलाय,गोळ्या, औषधी दिल्यात.आणं पाच दिसांनी या म्हणालेत.

दोन घास खाल्यावर बाबांनी औषधी घेतली जरा  आराम वाटत होतं त्यांना.दोन दिसानंतर मी कालेजला गेलो होतो.फोन ची रिंग वाजत होती.डाक्टर साहेबांचा कॉल होता.सर आजोबा दवाखाण्यात आले आहेत.वाटल वेदना जास्ती वाढल्या की काय…कोण आणलं असलं बाबांना दवाखान्यात ….अनेक प्रश्न होते मनात.  वेळ न दवडता  घाई घाईने दवाखाण्याकडे आलो पाहतो तर बाबा स्वतःच्या पायाने चालत दवाखान्यात दाखल झालेले दिसले.डाक्टर पण चकित  होते…काय हे माणुस केस फ्याक्चर आहे फिरु नका असा सल्ला दिल्यानंतर दुसर्याच दिवशी हा माणुस चालत चालत इथपर्यंत आला.डाक्टर म्हणत होते माझ्या डाक्टर झालेल्या कारकिर्दीत हजारोतुन ही पहिलीच  केस आहे…की पेशंट एवढा कांफिडेंट पणे सांगतोय की फ्याक्चर नाही…मी काल जसा गप घुमान दोघांचं संभाषण ऐकत होतो आज ही त्याच भुमिकेत फक्त आणि फक्त पहात होतो…



शब्दांकन

डॉ.गोविंद गुंडप्पा शिवशेट्टे

रोषणगांवकर

Comments