कसलं हे देश प्रेम
कसलं हे देशप्रेम...काय ही राष्ट्राप्रति एकनिष्ठता
झेंड्यांला वंदन करायचच मग काय...नातवानीं छोटा झेंडा हातात दिला.त्या झेंड्याला हातात घेऊन फिरवु लागले.पुन्हा पुन्हा दोन्ही हाथ जोडुन वंदन करुन लागले.
अशी घटना एक नाही अनेक घटना आहेत..२४ जानेवारी २०२२ रोजी अशीच बाबांची तबियत बिघडली.मला बोलावणं आलं...२५ ला कालेज करुन निघालो...प्रवास करुन आल्यानंतर कळालं की बाबां तीन दिवसांपासून काहीच खात नाही.आम्ही तर सांगु खुप थकलो...बघ आता तुझ तर ऐकतील...खुप सांगुन सवरुन शेवटी कसे वसे चतकोर चपाती खाऊ घालण्यात यशस्वी झालो... डिसेंबर व जानेवारीत यावर्षी कडाक्याची थंडी पडलेली होती.आम्ही पण जरा थंडीमुळे थोडं उशीरा उठणार होतो...२६ जानेवारी २०२२ सकाळी कडाक्याच्या थंडीत आम्ही भावंडं उठण्या अगोदर बाबा ऊठुन तयार.अंगातील कापड काढुन न्हानी (स्नानगृह) समोर उभा...मी त्यांना विनोदांने विचारलं बाबां कुठे सासरवाडीला निघालोय की काय...सकाळी-सकाळी...जरा शांत पणे त्यांनी उत्तर दिलं...विसरला की काय आज झेंडा हाय ...
(त्यांना स्वातंत्र्य दिवस कोणता आणि प्रजासत्ताक दिवस किंवा महाराष्ट्र दिवस यातला आंतर कळत नाही पण ध्याना मनात पक्कं ठासुन बसलय...झेंडा म्हणजे देशभक्ती.त्याला वंदन करावे )
मला म्हणाले चल लवकर तयार हो शाळेत झेंड्याचा जाऊ...सहज म्हंटल बाबा तुमची तबियत ठिक नाही मी जातो व वंदन करुन येतो.नाही मला जायायच आहे.. तुमचं काय नौकरदार तुम्हाला जावच लागत झेंड्याला. मनात असल तर बी नसलं तर बी...सत्यता होती त्यांच्या बोलण्यात.त्यांना घेऊन जावं तर वाटत होतं पण तबियतीचा प्रश्न होता.शेवटी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला...आणि म्हणालो बाबा तुम्ही शाळेत नका येऊ...पण काळजी करु नका तुम्ही आयुष्यभर कधीच शाळेची (शिक्षणाच्या निमित्ताने ) पायरी चढु शकलो नाही त्या शाळेला तुमच्या नावाने फुल नाही फुलांची पाकळी मदत करणार आहे.तेव्हा ते कुठे शांत झाले.शाळेतील झेंडावंदन झाले.शाळेच्या विकासासाठी ५०००रु मुख्याध्यापकांना बाबांच्या नावाने दान दिले...गावातील वडिलधारी माणसं बाबांना सांगत होती आज गुरुजींनी पाच हजार शाळेला मदत दिली..मला या गोष्टीचं कौतुक होत की ज्यांना आयुष्यभर अ ब क कधी वाचता नाही आलं...त्या अंगठा बहादुर बाबांच्या चेहर्यावर वेगळा आनंद ओसंडून वाहत होता.
ते अत्यंत स्वाभिमानाने सांगतात मला जस कळतंय तसा झेंडा कधीच चुकवला नाही...बाबा आता खुप थकले आहेत.अंथुरणाला खिळलेले तरी त्यांची काय ही झेंड्याप्रति व राष्ट्रा प्रति एकनिष्ठता .. खरच नव्या पीढींन शिकण्या सारखं आहे...
डॉ.गोविंद गुंडप्पा शिवशेट्टे
महाराष्ट्र महाविद्यालय,निलंगा
9423909705

Comments
Post a Comment